तो प्रवास सुंदर होता...
२९ डिसेंबर, २००९. माझ्या टीम मध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली. थोडी ठेंगणी, मध्यम बांधा आणि कुरळे केस. लांबून बघताना छोटीखुरी वाटायची. पण जवळून पाहताना बारा गावं फिरून आल्यावर अनुभवांनी येणारा समृध्दपणा जाणवायचा. पेहेराव नीटनेटका. ती नुकतीच काही महिने आधी भारतात परत आली होती. तिच्या बहिणीला MBBS इंटर्नशिपसाठी मुंबई बाहेर जायला लागणार होत. घरी आईच्या तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी चालू झाल्या होत्या. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन ती भारतात परत आली होती आणि अखेर तिला टाटा कम्युनिकेशनमध्ये नोकरी मिळाली. मला ह्या मुलीचं मोठं कौतुक वाटलं होत. अमेरिकेतली यशस्वी आणि मोठया पगाराची नोकरी सोडून येणं ही सोपी गोष्ट नव्हती. बंदीमें कुछ तो दम हैं! आम्ही दोघी एकाच टीम मध्ये होतो. कामाचं स्वरूप सारखं होत. त्यामुळे कामामध्ये येणारे सगळे उतार चढाव सारखेच होते. दोघीही कामात तत्पर होतो, एकमेकींना मदत करण्याचा स्वभाव होता, बोलायला मोकळ्या ढाकळ्या होतो. आम्हाला कळलंच नाही की आम्ही कधी जीवश्च कंठश्च मैत्रीणी बनलो. सगळेजण म्हणतात की ऑफिसमध्ये मैत्री होणं विरळाच. पण आमचा त्याला अपवाद होता. मग तुम्ह...