ताटातलं वादळ
माणसाची कशी मजा असते पहा ना. त्याला जे बघण्याची इच्छा असते तेच त्याला दिसत. ज्या गोष्टीचा त्याच्या मनात त्याच्या मनात विचार नाही अशी गोष्ट कितीही ढळढळीत असली, कितीही ढगांच्या म्युझिक वरती डिस्को करत असली तरी ती त्याला दिसेलच याची खात्री देता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण नवीन कपडे घातले की इतरांनी घातलेल्या कपड्यांकडे आपसूकच आपलं लक्ष जायला लागतं. नुसत लक्षच जात नाही तर कळत नकळत आपण त्यावर आपला अभिप्राय पण द्यायला लागतो. वास्तविक रस्त्यावरून जाणारा माणूस ना ओळखीचा ना पाळखीचा. मग तो काळा असो की गोरा, त्याचे कपडे भडक रंगाचे असोत की सौम्य रंगाचे असोत, ते त्याला शोभून दिसोत अगर न दिसोत. आपल्याला त्यामुळे काय फरक पडेल? काहीच नाही. पण इतका तार्किक विचार केला tar त्याला मन कशाला म्हणायचं? किंबहुना अशा बाबतीत बुद्धीच्या विरोधात चालतं त्यालाच मन म्हणायला हरकत नाही. मी माझ्या मनाचं असं धावणं अनेक वेळा बघितलं आहे. नवीन कार घेतली तेव्हा बघितलं, नवीन कपडे घातले तेव्हा बघितलं, नवीन घरात रहायला आले तेव्हा बघितलं. मनाला आवरायचा प्रयत्न ...