पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शक्तिमान

२००२ मध्ये मी पहिल्यांदा हिमालयात गिर्यारोहणासाठी जायचं ठरवलं. ही माझी पाहिलीच वेळ असल्यामुळे मनात थोडी भीती होती. आपल्याला हे जमेल की नाही अशी घालमेल सुरू होती. तेव्हाच कधीतरी युवाशक्तीने गिर्यारोहकांना माहिती देण्यासाठी मेळावा आयोजित केला. तिथे आमचे ग्रुप लीडर पण उपस्थित होते. तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं. उभा चेहेरा, मोठे बोलके डोळे, सावळा वर्ण, चांगली उंची आणि मध्यम बांधा. त्याला बघितल्यावर मनात पहिला विचार तरळून गेला की ट्रेकला गेल्यावर कुठे पडले झडले किंवा पायबिय घसरला तर हा माणूस निश्चित आपल्याला हात देऊ शकेल. गडी तसा हट्टाकट्टा वाटत होता. त्याच नाव काही का असेना पण मी त्याला शक्तिमान असं नाव मनोमन देऊन टाकलं. त्याला पाहून मन थोडं आश्वस्त झालं. नंतर भेट झाली ती थेट पुणे स्टेशनवर. अंगात टी शर्ट आणि ट्रॅक पँट, पायात शूज, डोक्यावर कॅप... आम्ही सगळे प्रवासाला साजेशा कपड्यात होतो. आम्हाला प्रत्यक्ष गिर्यारोहण करताना लागणाऱ्या सॅक नंतर देण्यात येणार होत्या. त्यामुळे आमच्याकडे साध्या बॅग होत्या. पण तो मात्र पूर्ण तयारीनिशी आला होता. त्याला बघून असं वाटलं की बस आता अर्ध्या तासात ग...